drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

रोख सिक्युरिटीजवरील कर्जे:

अनपेक्षित व तातडीच्या गरजा भागवण्याकरता अशा प्रकारच्या कर्जाची आवश्यकता भासते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्रे, जीवन विमा पॉलिसी, सरकारी रोखे, कंपन्यांचे समभाग इ. करबचतीच्या वा अन्य उद्देशाने गुंतवणूक केलेल्या रोख सिक्युरिटीज तारण म्हणून ठेवून कर्ज मिळू शकते.

कर्जाची रक्कम

नामांकित कंपन्यांच्या समभागांसमोर ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या बाबतीत, कर्जाची कमाल रक्कम रू. 10.00 लाख.

सरकारी रोखे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, जीवन विमा पॉलिसी इ. सिक्युरिटीजच्या बाबतीत कर्जाच्या रकमेवर कमाल मर्यादा नाही.

कर्जाची मुदत

मुदतकर्जांकरता सिक्युरिटीजची मुदतपूर्ती किंवा कमाल 5 वर्षे, यांपैकी जो कालावधी कमी असेल तितकी.

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पंमबँ शाखेला भेट द्या.

मार्जिन

मार्जिन
मुदतकर्जांकरता
ओव्हरड्राफ्टकरता
जीवन विमा पॉलिसीच्या बाबतीत शरणमूल्याच्या (Surrender Value) 15% शरणमूल्याच्या (Surrender Value) 25%
     
इतर सिक्युरिटीजच्या बाबतीत - दर्शनीमूल्याच्या 25%

तारण

ताबेगहाण / रोख सिक्युरिटीज बँकेच्या नावे करणे (Assignment)

हमी

कर्जाच्या रकमेनुसार एक वा दोन सक्षम त्रयस्थ व्यक्तींची वैय्यक्तिक हमी.

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo