drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

व्यापारी वाहनांकरता कर्जे:

व्यापारी वाहने प्रवासी वा मालाच्या वाहतुकीकरता वापरली जातात, त्यामुळे त्यांचा वापर व्यावसायिक कारणांकरता होत असतो. बस, ट्रक, टेम्पो, जीप, टिप्पर, व्हॅन, जेसीबी लोडर इ. प्रकारची वाहने उद्योगांमध्ये वापरली जातात.

उद्देश

व्यापारी तत्त्वावरील उपयोगाकरता वाहनखरेदी.

कर्जाची रक्कम

कर्जाची रक्कम वाहन नवे असल्यास वाहनाच्या देयकानुसार त्याची किंमत, नोंदणीचा खर्च व एकरकमी वाहनकर आणि वाहन जुने (वापरलेले) असल्यास खरेदी कराराचे मूल्य व बाजारभाव यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असते. दोन्ही बाबतींत, बँकेने वेळोवेळी विहित केलेल्या मार्जिनची रक्कम ग्राहकाने भरणे आवश्यक आहे.

चॅसिसच्या 90%
चॅसिसच्या 75% + बॉडी बिल्डिंगचा खर्च (अधिकृत विक्रेत्यामार्फत)
वापरलेले वाहन – बाजारमूल्याच्या 50%

कर्जाची मुदत

वाहन नवे असल्यास कर्जाची कमाल मुदत 60 महिने व वाहन वापरलेले असल्यास 36 महिने. परतफेड समान मासिक हप्त्यांवर. (EMI)

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँकच्या शाखेला भेट द्या.

मार्जिन

वरीलप्रमाणे

तारण

खरेदी करावयाचे वाहन नजरगहाण ठेवणे.

अतिरिक्त तारण (Collateral Security)

10 किंवा त्यापेक्षा अधिक गाड्यांचा ताफा असलेल्या वाहतुकदाराची हमी किंवा बँकेच्या नियमानुसार अन्य कॉर्पोरेट हमी असल्यास रू. 20.00 लाखांपर्यंतच्या कर्जाकरता अतिरिक्त तारण नाही.

हमी

कर्जाच्या रकमेनुसार एक वा दोन सक्षम त्रयस्थ व्यक्तींची वैय्यक्तिक हमी.

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo