drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
व्यक्तिगत बँकिंग


मुदत ठेव खाते कुणाला उघडता येते?

 • कोणाही व्यक्तीस
 • दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीना एकत्रितपणे
 • नैसर्गिक पालकांमार्फत अल्पवयीन मुला व मुलीना
 • एकमालक संस्था/ भागिदारी संस्था/ कंपन्या
 • कुठलीही संघटना वा कॉर्पोरेट मंडळ
 • हिंदू अविभक्त कुटुंब
 • विश्वस्त संस्था

खाते उघडण्याची पद्धत

 1. खाते उघडण्याचा फॉर्म (AOF) विहीत नमुन्यात असावा व अचूक भरलेला असावा, तसेच त्यावर ठेवीदाराने स्वाक्षरी केलेली असावी. मुख्यतः पूर्ण नाव व पत्ता, व्यवसाय, ठेवीची रक्कम, परतफेडीची अट, असल्यास स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स, जन्मतारीख इ. माहिती अचूक भरलेली असावी. (अज्ञान मुलांच्या बाबतीत फॉर्मवर ठेवीदार पालकांच्या स्वाक्ष-या असाव्यात)
 2. व्यक्तिंच्या बाबतीत ठेवीदाराने रीतसर नामनिर्देशन फॉर्म भरून देणे आवश्यक आहे
 3. पासपोर्ट आकाराचे फोटो
 4. अज्ञान मुलांच्या नावावरील ठेवींकरता त्यांचा जन्मदाखला देणे आवश्यक आहे. अज्ञान मुलांचे प्रतिनिधित्त्व त्यांच्या नैसर्गिक पालकांनी करणे आवश्यक आहे
 5. हिंदू अविभक्त कुटुंबे, एकमालक संस्था व अन्य कॉर्पोरेट संस्थांच्या बाबतीत, खाते उघडण्याच्या फॉर्मसोबत त्यांच्या घटनेशी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 6. वेळोवेळी नियमितपणे मुदत ठेवीवरील व्याज जमा करणे बँकेस सुलभ होण्याकरता ठेवीदाराला बचत खाते सुरू करण्याची विनंती केली जाऊ शकेल. ECS पद्धतीने अन्य बँकेतील खात्यात सदर व्याज पाठवण्याची कायम स्वरुपाची सूचना ठेवीदार देऊ शकतात.
 7. मुदत ठेव खाते उघडण्याच्या फॉर्मकरता येथे क्लिक करा

खातेवापरासंबंधीची सूचना

 • स्वतः
 • हयात असलेला सहखातेधारक वा क्र. 1 चा हयात असलेला सहखातेधारक
 • हयात असलेल्या सहखातेधारकांपैकी कुणीही एक (E or S)
 • कुणीही एक किंवा अनेक किंवा हयात असलेला सहखातेधारक किंवा हयात असलेले सहखातेधारक

मुदत ठेव

 1. मुदत ठेवीची किमान रक्कम रू. 1000/- आहे
 2. ठेवीचा किमान कालावधी 12 महिने व कमाल कालावधी 120 महिने आहे
 3. ठेवीवर व्याज मासिक/तिमाही/अर्धवार्षिक व वार्षिक तत्त्वावर देण्यात येते
 4. मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास नियमानुसार घटित व्याज आकारले जाईल
 5. वार्षिक (एप्रिल ते मार्च) रू. 10,000 पेक्षा जास्त व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागू. 65 वर्षांखालील सर्वसाधारण ठेवीदारांकरता फॉर्म 15G आणि 65 वर्षांवरील ठेवीदारांकरता फॉर्म 15H मागता येईल
 6. मुदत ठेवीदारांची नावे वाढवणे व कमी करणे शक्य आहे
  पुढे
   
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo