drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

शैक्षणिक कर्ज:

भारतातील वा परदेशातील, कुठल्याही शैक्षणिक विभागात, मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, तांत्रिक शिक्षणसंस्था, औषधीशास्त्र महाविद्यालये , माहिती आणि तंत्रज्ञान महाविद्यालये इ. मध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता पीएमसी बँक शैक्षणिक कर्ज देते. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार व गरजू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. [या योजनेखाली पत्रद्वारे शिक्षणक्रमांचा समावेश नाही].

अर्जदार

विद्यार्थी अज्ञान असल्यास आई-वडील / पालक अर्जदार असतील.
विद्यार्थी 18 वर्षांवरील वयाचा असल्यास तो/ती स्वतः कर्जाकरता अर्ज देऊ शकतात. आई-वडील/पालक सहअर्जदार असतील.

कर्जाची रक्कम

शिक्षणक्रमानुसार 

परतफेडीचा कालावधी

कर्जाची रक्कम रू 10 लाखांपर्यंत असल्यास- 120 महिने (अधिस्थगन कालावधी (मोरेटोरियम) सह)

कर्जाची रक्कम रू 10 लाखापेक्षा अधिक असल्यास - 180 महिने (अधिस्थगन कालावधी (मोरेटोरियम) सह)

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँक शाखेला भेट द्या.

अधिस्थगन कालावधी (मोरेटोरियम)

शिक्षणकाल अधिक 6 महिन्यांपर्यंत (कर्जाची रक्कम रू. 1.00 लाखापेक्षा कमी असल्यास मोरेटोरियम नाही)

 

मार्जिन

  रू. 4.00 लाखांपर्यंत रू. 4.00 लाखांपेक्षा अधिक
देशांतर्गत मार्जिन नाही एकूण खर्चाच्या 5% *
परदेशी   एकूण खर्चाच्या 15% *
*( एकूण खर्चामध्ये शिक्षण शुल्क, टर्म फी, राहण्याचा खर्च, प्रवासखर्च, पुस्तके, परीक्षा फी, इ. समाविष्ट आहे.)
शिष्यवृत्तीची रक्कम मार्जिनमध्ये मिळवणे आवश्यक आहे.

तारण

रू.5.00 लाखांच्या कर्जाकरता अतिरिक्त तारणाची आवश्यकता नाही. *

हमी

  1. दोन जामिनदार
  2. देशांतर्गत शैक्षणिक कर्जाकरता, स्थावर मालमत्ता वा रोख सिक्युरिटीजच्या स्वरूपात 100% अतिरिक्त तारण देऊ केल्यास जामिनदारांची आवश्यकता नाही

*अटी लागू


 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo