drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

ग्राहक कर्जे:

असे म्हणतात, की “जिथे घर आहे, तिथे जीवन असते”. घर हे एक सर्वात पवित्र, शांततामय आणि प्रेमळ स्थान असते. सर्व सुखसोयींनी युक्त आणि आधुनिक वस्तूंनी सुसज्ज असलेले स्वतःच्या मालकीचे घर, हे आपल्या सर्वांचेच स्वप्न असते. ते साकार करण्यासाठी पीएमसी बँक "ग्राहक कर्जे" या शीर्षकाखाली फ्रिज, वॉशिंग मशिन, कुकिंग रेंज, संगणक इ. दीर्घकालीन उपभोग्य वस्तू व उपयोगी वस्तूंच्या खरेदीकरता अर्थसहाय्य देते.

उद्देश

वैद्यकीय खर्च, राहत्या घराचे पुनर्नुतनीकरण, प्रवास, विवाह इ. विविध कारणांकरता पीएमसी बँक व्यक्तिगत कर्ज देते

कर्जाची रक्कम

कर्जाची कमाल रक्कम रु. ५,००,०००/- पर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेली आहे

कर्जाची मुदत

कर्ज 36/४८/६० महिन्यांमध्ये समान मासिक हप्त्यांवर(EMI) फेडता येते

व्याजदर

व्याजदरासंबंधीची माहिती आपल्या नजिकच्या पी.एम.सी बँकेच्या शाखेत मिळेल.

मार्जिन

कर्जाची रक्कम रू. 1,00,000/- पेक्षा कमी असल्यास - काही नाही
कर्जाची रक्कम रू. 1,00,000/- पेक्षा जास्त असल्यास - 25 %

हमी

कर्जाच्या रकमेनुसार एक वा दोन सक्षम त्रयस्थ व्यक्तींची वैयक्तिक हमी.

तारण

खरेदी करावयाच्या वस्तू नजरगहाण ठेवणे.

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo