drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
व्यक्तिगत बँकिंग

चालू ठेव योजना

कोण चालू खाते उघडू शकतो ?

 • कुणीही व्यक्ती स्वतःच्या नावावर
 • दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रितपणे
 • एकमालक संस्था
 • भागिदारी संस्था
 • हिंदू अविभक्त कुटुंब
 • प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या
 • पब्लिक लिमिटेड कंपन्या
 • बिगर सरकारी संस्था
 • सार्वजनिक निगम
 • नोंदणीकृत सहकारी संस्था, क्लब, संघटना इ.
 • विश्वस्त संस्था
 • शासकीय / निमशासकीय मंडळे / विभाग


(सूचना – अल्पवयीन बालक वा बालिकांच्या नावे चालू खाते उघडता येणार नाही)

प्रारंभिक ठेव

 • रू. 3000/-

खात्याचे विवरणपत्र

 • महिन्यातून एकदा दिले जाते

फायदे

 • कुठल्याही शाखेतून बँकिंग व्यवहार (ABB)
 • एटीएम सुविधा
 • भारतात कुठेही देय असलेली पे ऑर्डर व डिमांड ड्राफ्ट काढण्याची सोय
 • बाहेरगावाचे धनादेश प्राप्त करण्याची सोय
 • टेलिबँकिंग सुविधा
 • RTGS/ NEFT सुविधा
 • SMS बँकिंग सुविधा
 • इंटरनेट बँकिंग सुविधा
 • ई-स्टेटमेंट सुविधा

एटीएम सुविधा

 • एटीएम कार्ड/ INSTA कार्ड
 • पीएमसी बँकेच्या कुठल्याही शाखेतील खात्यातून, दिवसाच्या कुठल्याही वेळी, एका दिवशी रू. 25000/- पर्यंत रोख रक्कम काढता येते .
 • NFS व BANCS जाळ्याची (नेटवर्क) सुविधा प्राप्त असलेल्या खात्यातून (निर्धारीत यादीतील कुठल्याही बँकेच्या एटीएम मधून) दिवसाच्या कुठल्याही वेळी रू. 10,000/- पर्यंत रोख रक्कम काढता येते. प्रत्येक व्यवहाराकरता रू. 20/- शुल्क आकारले जाईल

किमान शिल्लक शुल्क

 • चेकबुक असलेल्या वा नसलेल्या खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास प्रचलित दराने किमान शिल्लक शुल्क आकारले जाते

आवश्यक कागदपत्रे

 • अलीकडचा फोटो
 • निवासाचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, शिधापत्रक, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, अलीकडचे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/संपत्ती कर आकारणी आदेश, सोसायटीचे देखभाल वर्गणी बिल, कायमस्वरूपी निवासाच्या पुराव्यासहित नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लीव्ह अँड लायसन्स करार इ.)
 • फोटोसहित ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नामांकित कंपनीने दिलेले ओळखपत्र इ.)
 • बँकेला परिचित आणि स्वीकारार्ह असलेल्या व्यक्तीची ओळख
 • सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत किंवा फॉर्म 60/61
 • रोखीमध्ये प्रारंभिक ठेव
 • व्यवयायाचा पुरावा
 • व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
 • संस्थेच्या घटनेनुसार असलेली अन्य कागदपत्रे (परिशिष्ट 1)
 • पूर्ण माहिती भरलेला खाते उघडण्याचा फॉर्म (AOF) येथे क्लिक करा

इतर माहिती

 • एखाद्या खात्यातून दिले जाणारे धनादेश पुरेशा शिलकी अभावी वारंवार परत येत राहिल्यास वा खाते अनियमित किंवा असमाधानकारक समजले जात असल्यास असे खाते बंद करण्याचा अधिकार बँकेस राहील
 • दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये खात्यात कुठलेही व्यवहार न झाल्यास असे खाते वापरात नसलेले वा निष्क्रिय खाते मानले जाईल
 • बँकेच्या नियमांत वेळोवेळी बदल, सुधारणा वा ते रद्द करण्याचे अधिकार बँकेकडे राहतील

सेवाशुल्क

परिशिष्ट -1

चालू खाते उघडण्याकरता संस्थेच्या घटनेनुसार आवश्यक असलेली अतिरिक्त कागदपत्रे

अ)एकमालक संस्था
(Proprietorship firm)
 • व्यवसायाचा पुरावा – दुकान व संस्थानोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत (shop & establishment), any certificate issued by / registration document issued by विक्री कर अधिकरण/ सेवा कर अधिकरण / व्यवसाय कर अधिकरण यांनी जारी केलेले कुठलेही प्रमाणपत्र/ नोंदणीपत्र, ताज्या ताळेबंदाच्या व प्राप्तिकर विवरणपत्राच्या लेखापरिक्षित प्रती, व्यवसाय सुरू असण्याबद्दल चार्टर्ड अकाऊंटंटचे पत्र
 • व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा - दुकान/ संस्था (वीज बिल, टेलिफोन बिल, ताजे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/संपत्ती कर आकारणी आदेश, सोसायटीचे देखभाल वर्गणी बिल, नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लीव्ह अँड लायसन्स करार इ.)
 • मालकी हक्काचे पत्र

ब) भागिदारी संस्था

आवश्यक कागदपत्रे     

 • संस्था व सर्व भागिदारांची पॅन कार्डे, सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत किंवा फॉर्म 60/61
 • व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा - दुकान/ संस्था
 • भागिदारी पत्र
 • भागिदारांची यादी
 • नोंदणी प्रमाणपत्र
 • नोंदणीकृत भागिदारीचा करार     

क) मर्यादीत कंपन्या

आवश्यक कागदपत्रे

 • कंपनी व सर्व संचालकांची पॅन कार्डे, सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत किंवा फॉर्म 60/61
 • कंपनीच्या पत्त्याचा पुरावा
 • नोंदणी प्रमाणपत्र
 • संचालकांची यादी
 • कंपनीचे ज्ञापन आणि घटना व कलमे (मेमोरँडम व आर्टिकल्स ऑफ असोसिएशन)
 • कंपनीच्या शिक्यासह ठराव
 • कंपनीचा CIN क्रमांक व सर्व संचालकांचे DIN क्रमांक
 • व्यवसाय सुरू झाल्याचे प्रमाणपत्र (Certificate of business commencement) (पब्लिक लिमिटेड कंपन्यांकरता)

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo