drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
अनिवासी भारतीय बँकिंग

एनआरआय खाते कोण उघडू शकते ?

 • नोकरी, व्यवसाय वा पेशा किंवा देशाबाहेर कायमस्वरूपी वा अनिश्चित कालावधीकरता राहण्याचा हेतू दर्शवणा-या अन्य कुठल्याही कारणाकरता भारताबाहेर (नेपाळ व भूतान सोडून) राहणारे भारतीय नागरिक
 • एखाद्या परदेशी सरकार, सरकारी प्रतिनिधी संस्था किंवा संयुक्त राष्ट्र संघटना व तिच्या संलग्न संस्थेसारख्या आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संस्थांमध्ये विशिष्ट कार्याकरता भारताबाहेर राहून काम करणारे भारतीय नागरिक
 • विशिष्ट कार्याकरता परदेशात पाठवले गेलेले वा त्यांच्या स्वतःच्या परदेशातील शाखेत नेमणूक दिले गेलेले (राजदूतावासासहित) केंद्र आणि राज्य सरकार, तसेच सार्वजनिक उद्योगांतील अधिकारी
 • परदेशात कायमचे स्थायिक झालेले भारतीय
 • स्थलांतर करून परदेशात गेलेले भारतीय
 • भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पाकिस्तान व बांगला देशाचे नागरिक सोडून)
 • अनिवासी भारतीय नागरिकांचे वा भारतीय वंशाच्या परदेशी व्यक्तींचे वैवाहिक जोडीदार (पाकिस्तान व बांगला देशाचे नागरिक सोडून)
 • परदेशात शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी

अनिवासी भारतीय खाते उघडण्याकरता कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत?

अनिवासी भारतीय खाते उघडण्याकरता संभाव्य खातेदाराने कुठल्याही अधिकृत शाखेमध्ये खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे -
 • अनिवासी भारतीय खाते उघडण्यासाठीचा फॉर्म पूर्ण माहीती भरून आणि संभाव्य खाते दाराच्या स्वाक्षरीसहित
तुम्ही परदेशात असताना तुमच्या खाते उघडण्यासाठीच्या फॉर्मवरील स्वाक्षरीची पडताळणी खालीलपैकी कुणीही करू शकेल -
 • तुम्ही राहात असलेल्या देशातील भारतीय दूतावास / वकिलात
 • तुम्ही राहात असलेल्या देशातील नोटरी पब्लिक
 • परदेशातील तुमची विद्यमान बँक
 • फॉर्मवर तुमचा फोटो चिकटवणे आणि त्यावर आडवी स्वाक्षरी
 • तुमच्या वैध पासपोर्टची छायाप्रत, ज्यात तुमचे नाव, पत्ता, नागरिकत्व, पासपोर्ट जारी करण्याची तसेच त्याची अंतिम तिथी, भारतातून प्रयाण करण्याची तिथी, भारतात परत येण्याची तिथी, असल्यास (सहखातेदार असल्यास सर्व सहखातेदारींचे तपशील सादर करणे आवश्यक आहे)
 • परदेशी जाण्याचे कारण दर्शवणारा वैध व्हिसा किंवा निवासी व्हिसा / परवाना, वर्क परमिट याची छायाप्रत. परदेशी जहाज कंपनीचे कर्मचारी असल्यास खलाशी ओळखपत्र आणि कंटिन्युअस डिस्चार्ज प्रमाणपत्राची छायाप्रत
 • स्थानिक निवासी पत्त्याचा पुरावा
 • परदेशातील निवासी पत्त्याचा पुरावा
 • मालक कंपनीने दिलेले नियुक्ती / नोकरीचे पत्र
 • लागू असल्यास, व्यवसायाचा पुरावा

फॉर्म डाऊनलोड करण्याकरता येथे क्लिक करा

तुमच्या एनआरआय खात्यात खालीलप्रकारे पैसे जमा होऊ शकतात -

  • तुमच्या भारतातील वास्तव्याच्या काळात रूपांतरीत केलेले परकीय चलन
  • कुठल्याही एनआरई खात्यातून हस्तांतरण, आणि
  • अंतर्दिश रेमिटन्स (परदेशी राऊटिंगमध्ये तीन प्रमुख चलने दिलेली आहेतः USD-Habib Bank, USD-Bank of India, GBPEURO) आणि JPY , AED

खात्याचे स्वरूप एनआरआय पासून बदलून निवासी खाते करणे

तुम्ही अनिश्चित काळाकरता भारतामध्ये राहण्याच्या उद्देशाने परत आल्यानंतर कृपया आम्हाला ताबडतोब तशी सूचना द्या.

 

 

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo