डिमॅट सेवा
कोणत्याही शाखेतून सेवा
कोअर बँकिंग प्रणालीमुळे (CBS) आमच्या ग्राहकांना कुठल्याही शाखेतून व्यवहार करता येतात. ग्राहकांच्या सोयीकरता पीएमसी बँक कुठलेही अतिरिक्त शुल्क न आकारता टोकनलेस बँकिंगची सुविधा पुरवते.
पैसे पाठवण्याची सुरक्षित आणि जलद पद्धत
ई-बँकिंगच्या दिशेने एक पाऊल – देशभरात कुठेही ताबडतोब पैसे पाठवण्याकरता पीएमसी बँक नाममात्र शुल्काने RTGS/NEFT सुविधा पुरवते.
ई-करभरणा
पीएमसी बँक ग्राहकांना त्यांचे कर ई-पेमेंट पद्धतीने भरण्याची सेवा पुरवते. त्यात अग्रीम कर, स्वयंमूल्यांकन कर, नियमित मूल्यांकनावरील कर, टीडीएस, संपत्तीकर/सिक्युरीटी व्यवहार कर, हॉटेल पावती कर/व्याजावरील कर/जमिनजुमल्यावरील कर, बक्षिस कर, किरकोळ लाभ कर (Fringe benefit Tax), केंद्रीभूत सेवा कर (CST), मूल्यवर्धित कर (VAT), सेवा कर, अबकारी कर आदींचा समावेश आहे.
डेबीट कार्डस्
- व्हिसा डेबीट कार्ड - ग्लोबल व्हिसा नेटवर्कचे लाभ, विशेषाधिकार आणि विस्तृत पोहोच यांचा एकत्रित वापर. हे कार्ड व्हिसा सक्षम एटीएम्सवर सुद्धा वापरता येते.
- रुपे डेबीट कार्ड - अंतर्देशीय हेतूंसाठी वापरले जाणारे एक डेबीट कार्ड.
- इएमव्ही- चीप डेबीट कार्ड - सुरक्षिततेसाठी खाय तयार करण्यात आलेले एक कार्ड जे कंझ्युमर कार्ड पेमेंटस्साठी सुरक्षा लक्षणीय प्रमाणात सुधारते आणि नकली/हरवलेल्या/चोरलेल्या कार्डांवरून फसवणूकीच्या पेमेंटस्ची शक्यता कमी करते.
- व्हिसा बिझीनेस डेबीट कार्ड - छोट्या उद्योजकांसाठी त्यांच्या आर्थिक गरजा सुरळित ठेवण्यासाठी एक सुविधा, कारण हे त्यांना आर्थिक आणि उत्पादनविषयक विशेषाधिकारांचा अविरत, सोयीस्कर वापर करू देते
डेबीट कार्ड मर्यादा, देणे आणि वार्षिक आकार
कार्डाचा प्रकार |
काढण्याची मर्यादा |
पीओएस + ऑनलाइन व्यवहार मर्यादा |
कार्ड देण्याचा आकार |
वार्षिक शुल्क |
रुपे इएमव्ही डोमेस्टिक इन्स्टा कार्ड |
10000 |
25000 |
50 + कर |
100 + कर |
रुपे ईएमव्ही प्लॅटिनम आंतरराष्ट्रीय कार्ड |
10000 |
25000 |
100 + कर |
100 + कर |
व्हिसा - पेवेव्ह ईएमव्ही इंटरनॅशनल गोल्ड कार्ड |
25000 |
50000 |
250 + कर |
150 + कर |
व्हिसा पेवेव्ह-ईएमव्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम कार्ड |
25000 |
100000 |
300 + कर |
150 + कर |
व्हिसा पेवेव्ह ईएमव्ही चिप कार्ड - बिझिनेस कार्ड |
25000 |
200000 |
500 + कर |
250 + कर |
डेबीट कार्ड मर्यादा निश्चीत करणे
तुमचे डेबीट कार्ड सुरक्षित करण्यासाठी आणखी एक उपाय. आवश्यक असल्याप्रमाणे डेबीटकार्ड मर्यादा निश्चीत करणे.
मर्यादा निश्चीत करण्यासाठी एसएमएस करा - SCL (विराम) तुमच्या कार्डाचे शेवटचे चार अंक (विराम) रक्कम आणि पाठवा ९७७३२५१३१३
अटी आणि शर्ती लागू
एसएमएस/मोबाइल बँकिंग
ज्या ग्राहकांनी एसएमएस बँकिंगसाठी नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या खात्यातील व्यवहार, बँकेने सुरू केलेली कोणतीही नवीन योजना, प्रॉडक्टस् यांची तत्परतेने माहिती मिळेल. पीएमसीबी मोबाइल्स मार्फत व्यवहार सुविधाजनक करते.
मोबाईल बँकिंग ग्राहकांना पुढील सेवांची सुविधा देईल.
1. खाते शिल्लक प्राप्ती
2. लघु विवरणपत्र
3. पी२पी आणि पी२ए ट्रान्सफरमार्फत बँकेत आणि इतर बँकांत निधीचे त्वरित हस्तांतरण.
4. मर्चंट पेमेंट सुविधा
5.एटीएम हॉटमार्किंग
मोबाइल बँकिंग चॅनेलमार्फत हस्तांतरण करताना बचत आणि चालू खात्यात अनुक्रमे रु. 200 आणि रु. 3000 किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे.
इंटरनेट बँकिंग
इंटरनेट बँकिंग ग्राहकांना पुढील सेवांची सुविधा देईल.
रिटेल इंटरनेट बँकिंग
1. खात्यातील शिल्लक पाहणे
2. खाते विवरणपत्र पाहणे आणिडाुनलोड करणे
3. बँकेच्या आत निधी हस्तांतरण
4. बँकेच्या बाहेर निधी हस्तांतरण (एनइएफटी आणि आरटीजीएस)
5. भावी दिनांकाची पेमेंटस् सेट करण्याची सुविधा
6. धनादेश स्थिती चौकशी
7. पेमेंट थांबवणे
8. पेमेंट गेटवेमार्फत ऑनलाइन पेमेंटस्
9. पेमेंट गेटवे मार्फत इपीएफ आणि इएसआयसी पेमेंट
कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग
1. खात्यातील शिल्लक पाहणे
2. खाते विवरणपत्र पाहणे आणिडाुनलोड करणे
3. बँकेच्या आत निधी हस्तांतरण
4. बँकेच्या बाहेर निधी हस्तांतरण (एनइएफटी आणि आरटीजीएस)
5. भावी दिनांकाची पेमेंटस् सेट करण्याची सुविधा
6. धनादेश स्थिती चौकशी
7. पेमेंच थांबवण्यासाठी मेकर/चेक सुविधा.
8. सध्या दुहेरी वापरकर्त्यामार्फत पेमेंट गेटवेज मार्फत ऑनलाइन पेमेंटस्
9. सध्या दुहेरी वापरकर्त्यामार्फत पेमेंट गेटवे मार्फत इपीएफ आणि इएसआयसी पेमेंट
10.मोठ्या रकमेची पेमेंट सुविधा.
इंटरनेट बँकिंग चॅनेल मार्फत हस्तांतरण करताना बचत आणि चालू खात्यांत अनुक्रमे रु. 2०० आणि रु. ३००० किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे.
एटीएमचे जाळे
पीएमसी बँक BANCS, NFS, VISA या जाळ्यांची सदस्य असल्यामुळे बँकेच्या ग्राहकांना जगभरातील असंख्य एटीएम्सचा उपयोग पैसे काढण्याकरता करता येतो.
जीवन विमा/अन्य (Non life) विमा उत्पादने व म्युच्युअल फंड्स
पीएमसी बँक, आयआरडीए (IRDA) च्या नियमांनुसार जीवन विमा/अन्य (Non life) विमा उत्पादनांच्या क्षेत्रात "कॉर्पोरेट एजंट" म्हणून काम करते. पीएमसी बँक मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. चे जीवन विमा उत्पादनांकरता प्रतिनिधित्व करते.
विमा कायदा, 1938 (IV OF 1938) खाली पीएमसी बँकला कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करण्याचा परवाना मिळालेला असून परवाना क्रमांक 3878348 असा आहे व तबँक, विमा कायदा अंतर्गत 1938 (1938 च्या चौथा) कॉर्पोरेट एजंट म्हणून कार्य करण्यास परवाना आहे. 26 डिसेंबर 2016 या कालावधीकरता वैध आहे.
"विमा हा ऐच्छिक विषय आहे"
मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.
नोंदणीकृत कार्यालय: 11 वा मजला, डीएलएफ चौक, जॅकारंडा मार्ग, डीएलएफ सिटी फेज II, गुरगांव - 122002.
पीएमसी बँक म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीविषयी सल्लादेखील देते.
लॉकर सुविधा
पीएमसी बँक आपल्या सर्व ग्राहकांना लॉकर सुविधा पुरवते. लॉकर सुविधा बँकेच्या कामकाजाच्या वेळेत पूर्णवेळ वापरता येते.
टेलिबँकिंग सेवा
टेलिबँकिंग सेवा/ स्वयंसेवी किऑस्कद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्याबद्दलची माहिती घरी, कार्यालयात आणि शाखेमध्ये स्वतंत्रपणे मिळवता येते.
फ्रँकिंग सुविधा
पीएमसी बँक तिच्या शीव शाखामध्ये फ्रँकिंग सुविधा पुरवते.
विशेष सोयी
- परीक्षा घेणा-या संस्था वा विद्यापीठाच्या नावे पे-ऑर्डर काढणा-या विद्यार्थ्यांना रू. 500/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास पे-ऑर्डर शुल्कात 100% सूट दिली जाते.
|