व्हिजन व मिशन
“उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि ग्राहक हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्वाधिक पसंतीची आघाडीची नागरी सहकारी बँक असा लौकिक मिळवणे हे आमचे धेय्य आहे.”
प्रोफाईल
- पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक ही एक बहुराज्यी्य शेडयुल्ड नागरी सहकारी बँक असून
तिचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र , दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात ,आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे.
- शीव, मुंबई येथे एका लहानशा जागेत, एकशाखीय बँक म्हणून,दि.13 फेब्रुवारी 1984 रोजी बँकेने कामकाजाला सुरुवात केली.गेल्या 35 वर्षामध्ये सहा राज्यांमध्ये 137 शाखांमार्फत ती ग्राहकांना सेवा देण्याचे कार्य करते आहे.
- भारतातील पहिल्या 10 सहकारी बँकांमध्ये आमच्या बँकेची गणना होते
मैलांचे दगड /ठळक घटना
- भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 साली बँकेस शेड्युल्ड दर्जा प्रदान केला. शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करणारी आमची सर्वात तरूण बँक आहे
- 2004 साली केंद्रीय नोंदणी अधिकरणाने बँकेस बहुराज्यीय बँकेचा दर्जा बहाल केला. अशाप्रकारे बँकेने राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले
- 2011 साली बँकेस परकीय चलन व्यवसायाकरता अधिकृत विक्रेता, वर्ग 1 चा परवाना देण्यात आला
सन्मान, पुरस्कार व सिद्धी
- आजवर बँकेस विविध बहुमान प्राप्त झाले आहेत
- 1999 साली 'अखिल भारतीय बँक ठेवीदार संघ, मुंबई' या ठेवीदारांच्या प्रतिष्ठित संघटनेने बँकेच्या ठेवीदार सेवाभिमुख कामकाजाच्या नीतिमत्तेच्या प्रशंसास्वरूप एक सन्मानचिन्ह देऊन बँकेचा गौरव केला आहे
- महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे 'सर्वोत्तम नागरी सहकारी बँक' म्हणून दिला जाणारा ‘पद्मविभूषण वसंतदादा पाटील’ पुरस्कार बँकेने नऊ वेळा पटकावला आहे
- सहकारी बँकिंग क्षेत्रातली, वाद निर्माण होण्याचे प्रमाण, तसेच अचानक सेवा खंडित होण्याचा कालावधी, या दोन्ही गोष्टी सर्वात कमी असलेली बँक म्हणून वर्ष 2012 मध्ये बँकेस एनपीसीआयचे ‘परीक्षकांचे विशेष पारितोषिक’ देण्यात आले
- 2004 सालापासून बँकेने प्रख्यात समाजसेवक आणि ग्राहक चळवळीचे नेते दिवंगत एम. आर. पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुरस्कार सुरू केला आहे. दरवर्षी या पुरस्काराची मानकरी व्यक्ती निवडण्याची जबाबदारी बँकेने अखिल भारतीय बँक ठेवीदार संघ या संस्थेकडे सोपवली आहे.
विशेष उल्लेखनीय
- बँकेने अनेक गोष्टी सर्वप्रथम करण्याचा मान मिळवलेला आहे व या वैशिष्ट्यांचा बँकेस सार्थ अभिमान आहे:
- 360 दिवस बँकिंग सुविधा (रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बँकिंग सेवा) देणारी पहिली बँक
- सहकारी बँकांच्या क्षेत्रात स्वयंसेवा काऊंटर सुरू करणारी पहिली बँक
- कितीही मोठी रक्कम थेट काऊंटरवर प्राप्त करण्याची सुविधा देणारी टोकनविरहित बँकिंग सेवा पुरवणारी पहिली बँक
- टेलिबँकिंगची संकल्पना राबवणारी पहिली बँक
- सहकारी बँकांच्या क्षेत्रात “डबल डेकर” आणि “बाल भविष्य योजना” यांसारखी उत्पादने सुरू करणारी पहिली बँक
- प्रत्येक नोंद / व्यवहाराची ओळख पटण्याकरता पासबुक/खाते विवरणपत्रामध्ये रक्कम दाता / प्राप्तकर्त्याचे संक्षिप्त नाव टाकण्याची सोय संगणकप्रणालीमध्ये करून घेणारी पहिली बँक. वर्ष 2008/09 मध्ये रिझर्व्ह बँकेने, अधिक चांगल्या ग्राहकसेवेच्या दृष्टिने सर्व बँकांना हीच पद्धत लागू करण्याचा सल्ला दिला
- जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्याच्या हेतुने बँकेने वर्ष 2011/12 मध्ये स्वतःचे संकेतस्थळ तसेच फेसबुक पान सुरू केले
- 70% महिला कर्मचारी असलेल्या बँकेचा महिला सक्षमीकरणावर ठाम विश्वास आहे. मुली व महिलांकरता शैक्षणिक कर्जावर बँक 1% कमी व्याज आकारते. महिलांकरता बँक एक खास बचत खाते योजना राबवते.
- बँक महिलांना त्यांच्या वयाच्या 58 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे सन्मानाने खास व्याजदर देऊ शकते.
- संस्थेची सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा) एक भाग म्हणून व विस्ताराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल या नात्याने बँकेने खालील तीन दुर्बल बँका संपादित केल्या व या विलीन झालेल्या बँकांच्या ठेवीदारांचे सर्व पैसे परत केले.
- कोल्हापूर जनता सहकारी बँक, कोल्हापूर - 2008
- जय शिवराय नागरी सहकारी बँक, मर्यादित, नांदेड – 2009
- चेतना सहकारा बँक नियमिता, सिरसी, कर्नाटक – 2010
या विलीन झालेल्या बँकांच्या ठेवीदारांचे सर्व पैसे परत करण्यात आले आहेत व ते सर्व आज समाधानी आहेत.
- बँक तिच्या स्वतःच्या एटींमद्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारामागे एक रुपया क्राय व सेव्ह द चिल्ड्रेन न्यासाला दान करते.
- हेल्पेज इंडिया या संस्थेला बँक भरघोस आर्थिक मदत देत आली आहे.
- आपल्या सुस्मित सेवेच्या ३० व्या वर्षात कृतान्यता व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून बँकेने आपल्या ग्राहक व हितचीन्ताकांकर्ता आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली.
सेवा व सुविधा
डीमेट सेवा
परकीय चलन सेवा
- सर्व शाखा व विस्तारित कक्षांमध्ये व्यग्तिगत धनादेश पुस्तकांची सोय.
- पे ओर्डर करता कोणतेही शुल्क नाही : धर्मादाय संस्था, ज्येष्ट नागरिक व पीएमसी अशा खातेधारक असलेल्या महिला आणि विद्यार्थी (शैक्षणिक कामाकरिता ) निःशुल्क पे ओर्डर खरेदी करू शकतात.
- विमा : बँक आपल्या ग्राहकांना जीवन विमा व सर्वसाधारण विमा उत्पादने देऊ करते.
तंत्राण्यानाद्वारे सोयीसुविधा व सेवा
- कुठल्याही शाखेतून व्यवहार(एनी ब्रेंच बँकिंग - कोअर बँकिंग सोल्युशन )
- एटीएम - सामायिक एटीएम जाळे(एनएफएस चे सदस्यत्व )
- इलेक्ट्रोनिक क्लिअरन्स सेवा (ECS)
- राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक क्लिअरन्स सेवा (एनइसीएस)
- आधार पेमेंट ब्रिज सोल्युशन (एपीबीएस)
- चेक ट्रनकेशन सिस्टीम (सीटीएस )
- नेशनल इलेक्ट्रोनिक्स फंड ट्रान्स्फर (एनइएफटी)
- रिअल टाइम ग्रीस सेटलमेंट (आरटीजीएस)
- इंटरनेट बँकिंग
- मोबईल बँकिंग (आयमपीएस)
- ई-विवरणपत्र
- एसएमएस बँकिंग
- ई-कर भरणा
- लौबी बँकिंग
- बंच नोट अक्सेप्टर (बीएनए) यंत्र
- धनादेश भरणा यंत्र
- किओस्क यंत्रे
- सेल्फ पासबुक प्रिंटर
- डीजीटल / ई-सिगनेचर
कुठल्याही प्रकारच्या माहिती, तक्रार वा सुचनाकरता चोवीस तास टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक सेवा बँकेकडे उपलब्ध आहे. सदर टोल-फ्री क्रमांक १८०० २२३ ९९३ असा आहे.
'आपली सेवा हाच आमचा आनंद' हे बँकेचे ब्रीदवाक्य आहे.
|